जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| पिंप्राळा परिसरात अवैध दारू विक्री होत असंताना महिलांनी पोलीसात तक्रार दिली होती. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी अवैध दारू निर्मूलनासाठी एक विशेष पथक नेमून सलग दहा दिवस धडक कारवाई केल्याने आता दारू विक्री पुर्ण केली आहे. त्यामुळे पिंप्राळा परिसरातील महिलांनी गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत होती. पिंप्राळा परिसरातील काही महिलांनी पंधरा दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी फेल झाले असले तरी पोलीस अधिकारी पास झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी विठ्ठल पाटील यांनी अवैध दारू निर्मूलनासाठी एक विशेष पथक नेमणूक मोहीम आखली होती. सलग दहा दिवस धडक कारवाई केल्याने परिसरातील अवैध दारू विक्री पूर्णतः बंद झाली असून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. तक्रारदार महिलांच्या तक्रारीवर कारवाई झाल्याने शुक्रवारी २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि आभार मानले.