यावल प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायतीने अचानकपणे ग्रामसभा घेतल्याने ग्रामस्थांनी नाराजीने ग्रामसभेला पाठ फिरवली आहे.
ग्रामसभेचे आयोजन करतांना दोन किंवा एक दिवसाअगोदर गावात दंवडी देवुन सूचना दिली जाते. मात्र आज दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन करतांना आज सकाळी ८ वाजेला त्यासंदर्भात गावात दंवंडी दिली. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त ग्रामसभेकडे पाठ फिरवली. ‘अचानक ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांची दिशाभूल केली जात आहे ही ग्रामसभा कार्यकारी मंडळाच्या फायद्यासाठी आहे की गावकऱ्यांच्या हितासाठी’ असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
चार ग्रामसभेचे नियोजनाविषयी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे हिंगोणा गावातील ग्रामपंचायतीने नियोजन केले नाही. ग्रामसभेत गावातील विविध समस्यांवर चर्चा केली जाते व समस्यांवर मार्ग काढला जातो परंतू आजपर्यंत गावातील ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीने कोणत्येही समस्या सोडविल्या नाही फक्त समस्या कागदोपत्रीच पूर्ण होताना दिसून येते.
“ग्रामसभेला मोजकेच ग्रा.प.सदस्य हजर राहतात तर मासिक सभेला सर्व कार्यकारी मंडळ हजर राहतात असे का ?” असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या ग्रामसभेला पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे