धरणाला तडे गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती ; जलसंपदा मंत्र्यांची कबुली

मुंबई/रत्नागिरी (वृत्तसंस्था) तिवरे धरणाला तडे गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तर धरण दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही दुरुस्ती केली, असे उत्तर दिले होते. म्हणून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असेही महाजन यांनी सांगितले.

 

 

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. या घटनेत सहा जणांचे मृतदेह सापडले असून 19 जण बेपत्ता आहेत. याविषयी गिरीश महाजन म्हणाले की, धरण आता रिकामी झाले आहे. धरण फुटल्यानंतर सर्वात मोठा तडाखा जवळच्या पहिल्याच गावाला बसला. या गावातील काही घरे वाहून गेली आणि त्यासोबत 24-25 जण बेपत्ता झाले. त्यापैकी सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर इतर गावातील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले असून आवश्यक मदत पुरवली जात आहे.

 

 

दरम्यान, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. दापोली लघुपाटबंधारे विभागाचे हे छोट धरण होते. आतापर्यंत सहा मृतदेह हाती लागले आहेत. गावकऱ्यांनी धरण फुटल्याची, गळत असल्याची तक्रार केली होती. जलसंपदा खात्यांतर्गत हे धरण येत असल्याने दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही दुरुस्ती केली, असे उत्तर दिले होते. म्हणून आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आता या धरणाच्या आजूबाजूच्या गावांना धोका नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Protected Content