अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सात्री गावातील बोरी नदी पात्रात सिमांकन मोजणी करतांना शेतीचा भाग अतिक्रमण मध्ये जात असल्याचा रागातून एकाने लोखंडी तलवार काढून दहशत माजवित असल्याने गावकऱ्यांनी पकडून त्याला मारवड पोलीसांच्या स्वाधिन केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील बोरी नदीच्या पात्रात सिमांकन मोजणीचे काम करत असतांना संदीप सुरेश पाटील याने सिमांकन केलेल्या भागात अतिक्रमित केलेल्या शेतीचा भाग जात असल्याचे समोर आले. ही बाबत संदीप पाटील यांनी त्यांचे शालक रामकृष्ण दिलीप काटे याला सांगितले. याचा राग आल्याने शनिवारी २ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रामकृष्ण पाटील याने हातात लोखंडी तलवार घेवून नदीपात्रात येवून दहशत माजवित होता. दरम्यान, गावकऱ्यांनी मिळून त्याला जागीच पकडले आणि मारवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी महेंद्र बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ८ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.