वीजवाहिनी तुटून मुसळी येथे चार बैल ठार

 

 

 

 

12 01 2016 bull12

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे काल रात्री १२.०० च्या सुमारास गावातून गेलेली मुख्य वीज वाहिनी तुटल्याने शॉक लागून चार बैल ठार झाल्याची घटना घडली.

वीज वाहिनी तुटून पडण्याची याच गावातली ही चौथी घटना आहे. गेल्या वर्षी अशाच एका घटनेत गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कालच्या घटनेत येथील गोरख रतन धमाले यांचे बैल ठार झाले असून त्यांनी यासंदर्भात पोलीस स्टेशन, वीजवितरण कंपनी व तहसील कार्यालयात तक्रार नोंदवली असून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांचा गांभीर्याने विचार करून त्यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Add Comment

Protected Content