मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा ७ रनने पराभव करत टी20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. भारतीय क्रिकेट टीमचे याबरोबरच आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या शिलेदारांनी संपूर्ण स्पर्धेत विजेतेपदाच्या थाटात खेळ केला. एकही सामना न जिंकता विजेतेपद पटकावण्याचा रेकॉर्ड केला. त्याबद्दल भारतीय टीमचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. या विजेतेपदाची शिल्पकार असलेली भारतीय टीम विशेष विमानानं मायदेशी परतण्यासाठी रवाना झाली आहे. बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे टीम इंडिया काही दिवस हॉटेलमध्येच अडकली होती.
भारतीय क्रिकेट टीमला बार्बाडोसहून घेऊन निघालेले विशेष विमान ४ जुलै रोजी ६ वाजता दिल्लीत पोहोचेल. दिल्लीत सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रम होणार आहे. तर मुंबईमध्ये संध्याकाळी टीम इंडियाची ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाने २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीच्या टीमची विजयी मिरवणूक मुंबईत काढण्यात आली होती. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी ही भारतीय टीमची मुंबईत विजयी मिरवणूक निघणार आहे. गुरुवारी संध्याकाळी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान ही मिरवणूक निघणार आहे.