कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही लस प्रभावी

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 6 रुग्ण समोर आले आहेत. यातच, कोरोना लस नव्या स्ट्रेनवरही प्रभावी असेल, असा दावा आरोग्यमंत्रालयाने केला आहे.

भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन हे मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, “लस यूके आणि दक्षिण अफ्रिकेत आढळणाऱ्या व्हेरिएन्टविरोधात काम करेल. कारण, सध्याची लस ही, या कोरोना व्हेरिएन्ट्सपासून बचाव करण्यात अयशस्वी ठरेल, याचा कसलाही पुरावा नाही.” तर, केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, यूके व्हेरिएन्टचे वृत्त येण्यापूर्वीच, आम्ही प्रयोगशाळेमध्ये जवळपास 5,000 जीनोम विकसित केले होते. आता आम्ही त्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वृद्धी करू.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले, नव्या स्ट्रेनने अनेक देशांचा प्रवास केला आहे. अशात आपल्याला अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. व्हायरसचा प्रसार रोखणे सोपे आहे. कारण ट्रांसमिशनची चैन अद्याप लहान आहे. ते म्हणाले, परदेशातून येणाऱ्या 20 पैकी एका प्रवाशाची यूके व्हेरिएन्टची टेस्ट केली जाईल.

 

Protected Content