अमेरिकेने भारतासोबतची ‘व्यापार संधी’ तोडली

d trump

 

केने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (जीएसपी) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. जीएसपीमुळे 1970 पासून भारताला 5.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 40 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीवर सूट मिळत होती. आता जीएसपीतून बाहेर केल्यानंतर भारताला हा फायदा होणार नाही. या निर्णयाचा मोठा परिणाम भारताला जाणवणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सिनेटमध्ये जीएसपी संदर्भातील माहिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर जाणवणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर दोन महिन्यांनी हा बदल लागू होणार आहे. जीएसपी अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. अमेरिकेच्या जीएसपी योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी होता. ही योजना विकसनशील देशांसाठी लागू केली होती. ट्रम्प यांनी नुकतेच यावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली होती. भारत हा अमेरिकी उत्पादनांवर अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. किमान कर अथवा बरोबरीचा कर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Add Comment

Protected Content