सर्पदंशाने मुलाचा दुदैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ओझर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा विषारी सर्पाने चावा घेतल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

गणेश भाईदास बारेला (वय – १५) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश बारेला हा मुलगा घरात झोपलेला असताना अचानक एका विषारी सर्पाने त्यास चावा घेतला. गणेश बारेला यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करित आहे.

Protected Content