भांडण बघण्यासाठी आलेल्या दोघांवर धारदार शस्त्राने वार

जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनीतील ‘अपना वाईन शॉप’समोर दोन मित्र घरी जात होते. तितक्यात भांडण सुरु असल्याचे दिसताच, बघण्यासाठी दोघे थांबले. मात्र, अज्ञात दोन जणांनीच त्या दोघांना धारदार शस्त्राने जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सकाळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब भाऊसाहेबर कुलथे (वय-३५) रा. शिंपी गल्ली, खंडेराव नगर हा रिक्षा चालक आहे. रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. शनिवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास बाळासाहेब कुलथे हा मित्र दिपक बाविस्कर रा. खंडेराव नगर हे दोघे दारू पिऊन शहरातील गणेश कॉलनीतील अपना वाईन शॉपकडून घरी जात असतांना त्याठिकाणी काही व्यक्तींचे भांडण सुरू होते. दोघेजण भांडण सुरू असल्याचे पाहून काय झाले हे पहाण्यासाठी गेले असता अज्ञात दोन जणांना याचा राग आला. अज्ञात दोघांनी काहीतरी अज्ञात धारदार शास्त्राने वार करून बाळासाहेब कुलथे आणि त्याचा मित्र दिपक बाविस्कर दुखापत केली. या दिपक बाविस्कर हा घटनास्थळाहून पळून गेला दरम्यान जखमी झालेला बाळासाहेब कुलथे याला काही नागरीकांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रिक्षाचालक बाळासाहेब कुलथे यांच्या फिर्यादीवरून रविवारी ९ जानेवारी रोजी पहाटे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!