ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

 चाळीसगाव प्रतिनिधी । नाशिकहून आईस भेटण्यासाठी येत असलेला मुलगा हिरापूर रेल्वे स्थानक जवळ भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वास उत्तमराव शितोळे ( वय ४४- रा. चितेगांव ता. चाळीसगाव)  असे मृत व्यक्तीचे नाव असून नाशिक येथे महिंद्रा कंपनीत काम करत होते. ते आपल्या आईला भेटायला नाशिकहून दुचाकीवर (MH-15GU-0814)येत असताना हिरापूर रेल्वे स्थानकाजवळ एका भरधाव ट्रकने धडक दिला व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ३:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्याच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, विधवा आई व मतीमंद भाऊ आहे. चितेगांचे सरपंच अमोल गणेशराव भोसले यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुंदरडे यांच्या निर्देशनाखाली होणार आहे.

 

Protected Content