जळगाव (प्रतिनिधी) अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारची पुढे चालणाऱ्या ट्रॅकल जोरदार धडक बसली. या अपघातात कारच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जालण्याहून जळगावला ट्रक क्रमांक (एमएच 15 ए जी 67 62 ) हा भुसार माल घेऊन जात होता. चिंचोली गावाजवळ आलेल्या स्पीड ब्रेकर जवळ ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कार क्रमांक (एमएच 19 सी व्ही 947) दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकला धडकली. त्यामुळे कारचे डाव्या बाजूने नुकसान झाले आहे. याबाबत कार चालक कीर्तीकुमार सुखलाल पवार यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात ट्रक चालक प्रकाश पांडू मस्के याच्या विरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान ट्रक अजिंठा ट्रान्सपोर्ट यांचा असल्याने ट्रक एमआयडीसी पोलिसात जमा करण्यात आला आहे.