एरंडोल, प्रतिनिधी । आपण कोणताही उत्सव साजरा करतांना हे लक्षात घेतले पाहिजे की त्या उत्सवाचे रूपांतर कधीही प्रबोधनात झाले पाहिजे असे प्रतिपादन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले. ते आज शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षीयस्थानवरून बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पोलिस निरीक्षक अरुण हजारे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रतापराव पवार, शालीग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, शिवसेना जेष्ठ नेते रमेश महाजन, भाजप उद्योग आघाडी प्रमुख सचिन विसपुते, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजेंद्र शिंदे, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, रविंद्र पाटील उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी प्रत्येक गणपती मंडळाने सध्या आपल्या राज्यात विधानसभा निवडणुक असल्याने मतदार जनजागृतीचे देखावे सादर करा, नगर पालिकेने स्वच्छ निर्माल्य रथ तयार करून त्यात निर्माल्य गोळा करा व मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून तो पुरग्रस्तांसाठी दान करा असे सांगुन सुरुवातीला आपण यासाठी हजार रुपये देत असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी गणपती मंडळाने त्वरित ऑन लाईन नोंदणी करा, गुलालाचा वापर करू नका, कोणीही डी. जे.लावू नये, गणपतीच्या मुर्त्या कमी उंचीच्या असाव्यात तसेच विसर्जन वेळी पोलीस विभागाच्या सुचनांचे पालन करा व ध्वनी प्रदूषण ही होणार नाही याची काळजी घ्या तर कोणाच्याही भावना दुखणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना यावेळी उपस्थित गणपती मंडळाच्या सदस्यांना पोलिस निरीक्षक अरुण हजारे यांनी केल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, किशोर निंबाळकर, प्रा.प्रतापराव पवार, बी.के.मुजावर व रविंद्र महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनतर्फे शहरातील गणपती मंडळांना गेल्या वर्षी उत्कृष्ट आरास सादर केल्याबद्दल माहेश्वरी गणेश मंडळाला प्रथम क्रमांक, नम्रता गणेश मंडळ द्वितीय तर सावता माळी गणेश मंडळाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. सदर मंडळांचे निरीक्षक म्हणुन पोलिस विभागातर्फे आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर, डॉ.सुधीर काबरा व रविंद्र पाटील या त्रीसदस्यीय समितीने केले. तर याठिकाणी कै. ब. वि. विसपुते सार्वजनिक वाचनालायतर्फे फिरती ढाल प्रथम क्रमांक जयहिंद गणेश मंडळास, द्वितीय क्रमांक जय श्रीराम गणेश मंडळास तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस सावता माळी गणेश मंडळास देण्यात आले. याप्रसंगी माहेश्वरी गणेश मंडळातर्फे पुरग्रस्तांसाठी २१ हजार रुपयांची व आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या तर्फे एक हजार रुपये मदत देण्यात आली.महाराष्ट्र विजवीतरण मंडळाचे उपअभियंता इंगळे गणपती मंडळाने रितसर महामंडळाकडे अर्ज सादर करुन साडे चार रुपये प्रतियुनिट प्रमाणे विज कनेक्शन घ्यावे असे सांगितले. बैठकीस शांतता समितीचे सदस्य नगरसेवक जाहिरोद्दीन शेख कासम, जावेद मुजावर, रविंद्र पाटील, बी.के.धुत, मुश्ताक शेख, सुनील बडगे, संजय पाटील, मोहन चव्हाण, विशाल सोनार, सुनिल चौधरी, दशरथ चौधरी, शेख सांडू शेख, सचिन महाजन, जितेंद्र महाजन, अमनुल्ला बापु, डॉ.सुधीर काबरा व शहरातील सर्व गणपती मंडळांचे पदाधिकारी व सदस्य हजर होते. सुत्रसंचालन व आभार किशोर पाटील कुंझरकर यांनी मानले.