मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | महाविकास आघाडीने तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होणार नाही. असे विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी म्हटले. यावर राज्यात विश्वासघाताची परंपरा आमची नाही. ती कोणी सुरु केली हे जनतेला माहित आहे, असे म्हणत खा.संजय राउत यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तप्त असून पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांमध्ये टीका टोमणे सुरू आहेत. भाजपातर्फे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, कोल्हापूरचे माजी खा. धनंजय महाडिक यांनी अर्ज दाखल केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत, तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होणार नाही असे म्हटले.
यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देशात संसदीय लोकशाही असून अशा प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल होत असतात. आणि उत्तर देण्यासाठी ही निवडणूक असेल, तर ठीक आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग देखील मतदान करू शकतात, तर मला माहीत नाही. जे आमदार आहेत, ते अपक्ष वा लहान पक्षांचे आमच्याकडे असून संपूर्ण संख्याबळ आहे. तुमच्याकडे असेल तर निश्चितच त्यांनाहि अधिकार आहे. जिंकण्यासाठी संख्याबळ आवश्यक आहे ते आखूनच महाविकास आघाडीने संपूर्ण गणित केले आहे. आणि जर अशाप्रकारे कोणाला निवडणुका लढायच्या असतील तर, केंद्राकडून जसे लक्ष आहे, तसे आमचे गृह खाते आणि मुख्यमंत्री यांचे लक्ष आहे. निवडणूक बिनविरोध झाली तरी आणि नाही झाली स्वागत आहे.