भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरातून एका व्यापाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचे २ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारासमोर आले. याबाबत मंगळवारी ५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक असे की, अब्दुल रहेमान अब्दुल गफार (वय-५८) रा. जामन मोहल्ला, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ बीआर ५२६९) ही कामाच्या निमित्ताने ते वापर करत असतात. शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर अब्दुल रहेमान यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर मंगळवार ५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान पाटील करीत आहे.