व्यापाऱ्यांना बजावलेल्या नोटीसा रद्द करण्याची भाजपची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस  न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील व्यापारी संकुलातील ३० ते ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता भुसावळ नगरपालिकेने दुकाने खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहे. या पालिकेने बजावलेल्या नोटीसच्या विरोधात भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. बुधवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपच्या वतीने भुसावळ नगरपालिकेसमोर आंदोलन करून नोटीस रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरात गेल्या ३० ते ५० वर्षांपासून व्यापारी हे भुसावळ नगरपालिकेच्या मालकिचे दुकाने भाडेतत्वावर दिले आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून संकुलातील दुकानांचे भाडे थकविल्याने दिवाळीपुर्वी वसुलीसह दंडाची आणि दुकाने खाली करण्याच्या नोटीसा पालिकेने बजावल्या होत्या. परंतू दिवाळी असल्याने तूर्तास स्थगिती दिली होती. त्यानंतर आता भुसावळ नगरपालिकेने पुन्हा दुकाने खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहे. पालिकेने बजावलेल्या नोटीसीला भाजपकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला असून भुसावळ नगरपालिकेवर मोर्चा काढून तात्काळ नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे. अचानकपणे दुकाने खाली करण्याचे आदेश पालिकेने दिल्याने व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असून व्यापाऱ्यांना बजावलेली नोटीस तात्काळ रद्द करावी, अशी मागणी भाजपने निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content