जळगावात बर्निंग कारचा थरार; शार्टसर्कीटमुळे लागली आग !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील महाबळ परिसरात असलेल्या लांडोरखोरी उद्यानानजीक शुक्रवारी २४ जानेवारी रोजी सकाळी शार्टसर्कीटमुळे कारने अचानक पेट घेतला. महानगर पालिकेच्या अग्निशमनद्वारे ही आग विझविण्यात आली. या आगीत चार जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

जळगाव शहरातील आदर्शन नगर परिसरात गुरूमीत सिंग हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. नेहमीप्रमाणे गुरूमीत सिंग हे आपल्या कार क्रमांक (एमएच १९ बीयू ३००१) ने महाबळ परिसरात लांडोरखोरी येथे आलेले होते. त्यावेळी त्यांनी मोहाडी रस्त्यावर कार उभी केली होती. दरम्यान कारमध्ये शार्टसर्कीट झाल्याने सुरूवातीला धुर निघाला आणि त्यानंतर क्षणात कारने पेट घेतला. कारने पेट घेतल्यानंतर त्यांनी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होवून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कार संपुर्ण जळून खाक झाली होती. या आगीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content