जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून तरुणावर तीन जणांनी दुचाकी अडवून मारहाण करत चॉपरने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची घटना कांचन नगरातील कालंका माता मंदीराजवळ घडली होती. याप्रकरणी रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तिघांना शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील डीएनसी महाविद्यालयाजवळ पवन अशोक कोळी (वय-३०) रा. डीएमसी कॉलेज, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पवन हा कांचन नगर परिसरातील कालंका माता मंदिराजवळ चिकन घेण्यासाठी दुचाकीने जात होता. त्याचवेळी संशयित आरोपी गोपाल इंदल कोळी, रोहित साईनाथ कोळी, योगेश घनश्याम कोळी सर्व रा. कांचन नगर जळगाव या तिघांनी पवनचा रस्ता आडविला आणि जुन्या वादातून त्याला मारहाण करून केली. त्यानंतर गोपाल इंदल याने चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या पवनला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी पवन कोळी याचे काका सुनील बाबुराव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोपाल इंदल कोळी, रोहित साईनाथ कोळी, योगेश घनश्याम कोळी तिघे रा. कांचन नगर, जळगाव या तिघांविरोधात रात्री उशिरा शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शनीपेठ पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत तीनही संशयित आरोपींना रात्री उशीरा अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.