जामनेरात मराठा समाजाचे आंदोलन; तहसीलदारांना निवेदन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षण मागणीच्या उपोषण करणाऱ्या मराठा समाजाचे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केल्याच्या निषेधार्थ सोमवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील राजमाता जिजाऊ चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे आज राज्याच्या विविध भागांमध्ये संतप्त पडसाद उमटले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. जालना आणि धाराशिवमध्ये बंदला हिंसक वळण लागले. याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावी, मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाची माफी मागावी या मागणीसाठी जामनेर तालुका मराठा समाजाच्या वतीने सोमवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील राजमाता जिजाऊ चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content