चोरट्यांनी १७ लाख रूपये असेलेले एसबीआयचे एटीएम लांबविले

चाळीसगाव  प्रतिनिधी । खरजई नाक्या जवळील स्टेट बॅक ऑफ इंडियाचे १७ लाख रुपये असलेले एटीएम मशीन रात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे.

चोरट्यांनी चारचाकी वाहनातून एटीएम मशीन चोरुन नेल्याने पोलीस चारचाकी वाहनाबाबत काही सुगावा लागतो यादृष्टीने तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. घटनास्थळी उपविभागीय आधिकारी कैलास गंवाडे, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, एपीआ विशाल टंकले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.

Protected Content