जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जानकीनगरात घरासमोरुन वायरमन तरुणाची दुचाकी लांबविल्याप्रकरणी शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. .
जानकीनगरात शैलेंद्र सुरेश कोळी (वय ३६) हे वास्तव्यास आहेत. ते वायरमन आहेत. १३ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता शैलेंद्र कोळी यांनी त्यांची एम.एच.१९ ९६४६ या क्रमाकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाले असता, अंगणात उभी दुचाकी मिळून आली नाही, सर्वत्र शोध घेतला मात्र त्यानंतरही दुचाकी मिळून न आल्याने नऊ दिवसानंतर शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहेत.