चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पोतदार शाळेच्या परिसरातील एका घरात मध्यरात्री चोरी करतांना एकाला चोरट्यांला रंगेहात पकडले आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, महेंद्र लक्ष्मणराव शितोळे (वय-४५) रा. पोतदार शाळेजवळ चाळीसगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते गॅरेज काम करून आपला उदरनिर्वाह करतात शिवाय शेतीचे कामेही करतात. २ मे रोजी रात्री १० वाजता जेवण झाल्यानंतर महेंद्र शितोळे हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी सर्व कुटुंबीय झोपलेले होते. दरम्यान ३ मे रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास महेंद्र शितोळे आणि त्यांचा मावस भाऊ सचिन वाबळे हे दोघे शेतातून घरी आले. महेंद्र यांनी बाहेर गाईला चारा टाकला व घरात जात असताना त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना एक चोरटा घरात चोरी करताना आढळून आला. महेंद्र आणि सचिन यांनी त्याला पकडून ठेवले. यात महेंद्रला जोराचा झटका दिल्याने ते ओट्याखाली पडले. परंतू सचिनने त्याला घट्ट पकडलेले होते. दोघांनी गल्लीत आरोड्या मारल्याने गल्लीतील सर्वजण जागे झाले. चोरट्याचे नाव विचारले असता पंढरीनाथ नागो जाधव (वय-२५) रा. हरीगिरी बाबा नगर, चाळीसगाव असे समोर आले आहेत. महेंद्र शितोळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पंढरीनाथ जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.