जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील बीओटी कॉम्प्लेक्समधील इलेक्टरीक दुकान फोडून दुकानातून २७ हजार रुपये किमतीचा सामानांची चोरी केल्याचे घटना उघडकीला आले आहे. याबाबत शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर रिजमल चंदनाणी (वय-४५) रा. गणपती नगर, जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोबाईल विक्रीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जामनेर शहरातील बीओटी कॉम्प्लेक्स येथे मोबाईल विक्री व इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास सुमारास अज्ञात चोट्याने दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकावून दुकानातून २० हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक सामान आणि ७ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स मशीन असा २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल चाटे करीत आहे.