खडका गावातून तरूणाच्या दुचाकीची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खडका येथील एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी ४ जुलै रोजी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस भरत सपकाळे वय २२ रा. खडका ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १ जुलै रोजी रात्री १० वाजता त्याने त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ इबी ८१९२ ही घरासमोर पार्कींगला लावलेली होती. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी मंगळवारी २ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला पंरतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवार ४ जुलै रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येवूलकर हे करीत आहे.

Protected Content