शिवरायांच्या पुतळा कोसळल्याचा ठाकरे गटातर्फे केंद्र व राज्य सरकारचा निषेध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील ३५ फुट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी अचानक पडला. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान असून पाचोरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे आज २७ ऑगस्ट रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकार, राज्य सरकार व संबंधित बांधकाम ठेकेदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घटनेप्रकरणी रोष व्यक्त करण्यात आला. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी निषेधाचे फलक घेऊन उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उबाठा सेनेच्या कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निषेधाचे फलक हातात घेऊन राज्यकर्त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, अॅड. अभय पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, हरिभाऊ पाटील, पप्पू राजपुत, राजेंद्र राणा, खंडु सोनवणे, शेख रसुल शेख उस्मान, पप्पू जाधव यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content