मुख्याध्यापकासह शिक्षकांनी घेतली विद्यार्थी व पालकांची सदिच्छा भेट

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साकेगाव येथून जवळ असलेल्या भानखेडा गावात भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांच्या सदिच्छा भेटी घेतल्या.

त्यावेळी मुख्याध्यापक एस. जी. मेढे, जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शिक्षक पी. आर साखरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक एस. जी मेढे यांनी शासना कडून आदीवासी विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सवलती बद्दल व आदिवासी लोकांना मिळत असलेल्या सवलती बद्दल सखोल माहिती दिली व मुलांना शाळेत नियमित पाठविणे का आवश्यक आहे त्या बद्दल मार्गदर्शन केले. जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी मुलींना शिक्षण देणे काळाची किती गरज आहे. हे सांगितले. एक शिकलेली स्त्री घराचा उद्धार करू शकते, असे त्या त्यावेळी म्हणाल्या.

जेष्ठ शिक्षक पी आर. साखरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज शिक्षण फक्त केवळ पोट भरण्यासाठी साठी घ्यावयाचे नसून आपला व समाजाचा व आपल्या परिवाराचा विकास करण्यासाठी घ्यावयाचे आहे म्हणून सर्व माता भगिनींनी त्याच्या मुला मुलींना दररोज शाळेत पाठविणे आवश्यक आहे. या प्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे, समाज व गाव अध्यक्ष धोंडीराम लक्ष्मण पवार, शिक्षक एस. टी चौधरी, नाना पाटील, मनोज किरंगे, प्रविण चोधरी, शिक्षिका शालिनी बनसोडे संध्या धांडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, तसेच सर्व पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content