भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील पिचर्डे शेतातील ऊसाला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. यात तोंडी आलेल्या उस जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकरी विश्वास उत्तम पाटील यांच्या मुलाच्या नावाने असलेला पांढरद रस्त्यावरील पिचर्डे शिवार गट नं १७१ क्षेत्र ९० आर क्षेत्रात ऊस पिकाची लागवड केली होती. काही दिवसात ऊसतोडणी वर असतांना रात्री अज्ञात व्यक्तीने पुर्ण ऊस पेटवून दिला आहे. ऐन दिवाळीत तोंडावर तोंडी आलेले उत्पन्न हातातून जाईल. गेल्या १० महिन्यांपासून या ऊसाची देखरेख विश्वास पाटील ठेवत होते. काल विश्वास पाटील नेहमीप्रमाणे शेतातील सर्व कामे करून संध्याकाळी घरी आले. रात्री अचानक १० वाजता ऊस पेटत असतांना कळाले. तोपर्यंत पुर्ण ऊस जळुन गेला होता. विश्वास पाटील यांचे म्हणणे आहे की, ४-५ दिवसात ऊस तोडणार होतो, जवळपास माझे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. यावेळी पिचर्डे तलाठी रामसिंग जारवाल,सोबत पिचर्डे पोलिस पाटील श्रीमती चेतना पाटील,तसेच अरुण जोशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पुढील मदतीसाठी प्रस्ताव पाठवु असं सांगितलं यावेळी पिचर्डे येथील शेतकरी उपस्थित होते.