भुसावळ, प्रतिनिधी | कार्यकर्ते व बूथ प्रमुख यांची मेहनत यावरच पक्षाचे यश अवलंबून असते असे सांगत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला जे यश मिळाले ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या विकास कामांच्या जोरावर तसेच पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ प्रमुख यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रतिपादन केले. ते आज भुसावळ येथे विधानसभा निवडणूकी करिता आयोजित कार्यकर्त्याच्या ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अंतर्गत बूथ संंमेलनात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे खासदार रक्षा खडसे राज्याचे उपाध्यक्ष अशोक कांडेलकर , आमदार संजय सावकारे ,नगराध्यक्ष रमण भोळे, पं. स. सभापती प्रीती पाटिल , उप सभापती वंदना उन्हाळे, तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, अलका शेळके, तालुका महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष शैलजा पाटील, शहर अध्यक्ष पुरषोत्तम नारखेडे , जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खेवलकर खडसे, महिला शहर प्रमुख मीना लोणारी , रजनी सावकारे , पिंटू ठाकुर , मनोज बियाणी, युवराज लोणारी ,भुसावळ विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीतही बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी भुसावळ विधानसभा मतदार संघात प्रचंड मेहनतीने पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिकयाने विजयी करावे व विकास कामे जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. हे सरकार सर्व स्तरावर यशस्वी ठरल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला बहुमत मिळणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जास्तीत जास्त मतदान आपल्या बूथवर करून घ्यावे जेणे करून आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्या पाच वर्षाच्या विकास कार्याचा वृत्तांत असलेल्या “दृष्टि क्षेप ” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. खासदार रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक बुथनुसार आपल्याला जी मते मिळाली त्यापेक्षा जास्त मिळून दाखवावे व यासाठी मतदार यांचा अभ्यास करून प्रत्येक मतदाराला मतदानपर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले. अवघ्या पाच वर्षात महाराष्ट्रातील भाजप सरकारने सर्वस्तरावर चांगली कामगिरी करून विकासाचा डोंगर उभा केला आहे. भुसावळ मतदारसंघातील सावकारे विकासाची कामे केली आहे याकरीता पुन्हा आमदार संजय सावकारे यांना जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी बूथ प्रमुखानी जोमाने कार्यास लागा महिलांनी सुद्धा जास्तीत जास्त लक्ष घालावे असे आवाहन केले. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील पदाधिकारी ते बूथ प्रमुख ते कार्यकर्ते तसेच शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे यांचेसह सर्व नगरसेवक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी भाजपामध्ये जाहिर प्रवेश घेतला. यात डॉ. दिलीप बरकले, रविंद्र पाटिल, निवृत्ती पाटिल , विलास राजपूत, मंगेश डोंगसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे
…आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड
तब्बल २ तास विलंबाने कार्यक्रमास सुरवात झाली. त्यातही अधून मधून ना. मुनगंटीवार येत आहेत म्हणून जाहिर केले जात होते. मात्र अचानक ना. मुनगंटीवार यांचे विमान प्रवासाला पुढे त्रास होण्याची शक्यता वर्तविन्यात आल्याचे सांगून ते उपस्थित राहु शकत नसल्याचे सांगताच राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्षेत असलेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. एवढेच नव्हे तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा अत्यंत महत्वपूर्ण कॉल आल्याने ते कार्यकर्त्याशी संवाद न साधता जळगावकडे रवाना झाले यामुळे सुद्धा काही पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये कुजबुज सुरु झाली.