कोल्हापूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, अशा शब्दांत खंत व्यक्त करीत राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केला. हा विषय आमच्यासाठी संपला असून मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच असल्याचे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेकडून अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा मिळाला नाही, आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, म्हणून राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले आहे. यावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली जात आहे. राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने पाठींबा द्यावा असे संभाजीराजेंनी म्हटले होते. यावर त्यांना शिवबंधन बांधा, पाठींबा देऊ. तसेच पुरस्कृत हा विषय मला सहकाऱ्यांशी बोलावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं होते. आणि ठरल्याप्रमाणे यावेळी राज्यसभेच्या दोन जागा या शिवसेनेच्या असून आमच्या पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे घेतात. शिवसेनेचा उमेदवार तिथे आणायचा हे आधीच ठरलेले होते आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीकडून निर्णय झाला कि त्यावर विरोध आणि टीका, अशीच भूमिका राज्यात विरोधीपक्ष हा विरोध करण्याचेच काम करीत आहे. यातून विरोधासाठी विरोध करणाऱ्यांकडून मनस्वी आसूरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न नेहमीच केला जात असतो. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जरा हॉट झाले आहे, असे म्हणत खा. संजय राऊत यांनी विरोधीपक्षावर टीका केली.
राजकारणात राजे, राजघराणी यांचे उदाहरण राजस्थानातच पहा. महाराणा प्रतापांचे वंशज पक्षात आहेतच ना. आम्हीपण विनंती केली, त्यांनी नाही स्वीकारली. आणि संभाजीराजेंची उमेदवारी हा विषय आमच्यासाठी संपला.
चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? आम्हाला २०१९ मध्ये कुणी शब्द दिला? कुणी मोडला? त्यांनी शब्द दिला त्याचा आधी खुलासा करा. आणि एवढा कळवला असेल तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडील ४२ मते द्या, असे म्हणत संजय राऊतांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.