Home Cities भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू !

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू !


साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर लावण्यात आलेले पथदिवे हे आज चक्क दिवसा देखील सुरू असल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग सहावर नुकतेच राष्ट्रीय महामार्गाचे संपादिकरण पूर्ण झाले व चौपाटीकरणावर असलेल्या प्रत्येक गावावर हायमास्ट लाईट लावण्यात आले आहेत. नेहमी हे लाईट मध्यरात्री एक वाजे एक ते दोन वाजेच्या सुमारास बंद करण्यात येतात व नंतर चालू करण्यात येतात. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आता रात्री लाईट बंद व भर दिवसा सुरू त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नाचे चिन्ह निर्माण झाले तरी याची सखोल चौकशी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर त्वरित कारवाई करण्यात येईल अशी मागणी करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर असलेले दिवे हे सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू असल्याचे शनिवारी दिसून आले असून या प्रकरणाची दखल घेऊन विजेची नासाडी थांबवावी तसेच संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.


Protected Content

Play sound