अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पाचकंदील आणि गांधलीपुरा भागात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली आहे या संदर्भात बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील पाच कंदील आणि गांधलीपुरा या भागात पैसे देणे घेण्यावरून वाद निर्माण झाला या वादातून एकमेकांना मारहाण करण्यात आली. दरम्यान पहिला गटातील नाजमीन शेख अशपाक वय-२९, रा.गांधलीपूरा अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी अकीब अली मुजाहिद अली, युसुफ अली मुजाहिद अली, फिरोज शेख अनवर उर्फ शाहरुख सिंगर, दानिश अली हसन अली, रियाज मौलाना आणि कुदरत अली सर्व रा. गांधली पुरा अमळनेर यांनी महिलेच्या घरातील शिवीगाळ करून धमकी देण्यात आले.
तर दुसऱ्या गटातील अकिब अली मुजाहिद अली सय्यद वय-२६, रा.गांधलीपुरा,अमळनेर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, अमळनेर शहरातील पाच कंदील चौकात उभा असताना संशयित आरोपी सलीम शेख चिरागोद्दिन उर्फ सलीम टोपी, इमरान शेख सलीम शेख, रिजवान शेख सलीम शेख, कादिर अली सय्यद, अयाज शेख गयासोउद्दीन सर्व रा. गांधलीपुरा, अमळनेर यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या घटने संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पीएसआय राजू जाधव हे करीत आहे.