नर्मदा (वृत्तसंस्था) आठ देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनने जगातील आठ आश्चर्यांमध्ये नर्मदेच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेला ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ पुतळ्याचा समावेश केला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, मला हे सांगताना खूप आनंद होतोय की, अद्वितीय प्रतिमा असलेल्या ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ला एससीओच्या आठ आश्चर्यात सामिल करण्यात आले आहे. या सन्मानामुळे नक्कीच पर्यटक इकडे अधिक आकर्षित होतील. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया स्थित स्टॅच्यु ऑफ युनिटीला एससीओच्या आठ आश्चर्यांत स्थान मिळणे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशन एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्यामध्ये रशिया, चीनसहीत आठ सदस्य देशांचा समावेश आहे.