धरणगावात शिवाजी महाराजांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात

902639f1 86e2 4435 8cd0 ddf28d1e30bf

धरणगाव, प्रतिनिधी | येथील बस स्टॅन्ड परीसर, शिवाजी महाराजांचा पुतळा आणि उड्डाणपूल या भागात मोठी रहदारी असते. या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्यांची मोठी गर्दी होत असून त्यांच्यात जागेवरून सतत वाद होत असतात. त्यांच्या कोंढाळ्यामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे.

 

या चौकात शाळेचे विद्यार्थी ग्रामीण भागातील लोक व गावातील नागरिक विविध कारणांनी येत-जात असतात. दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणी रस्त्यावर भाजीपाल्याच्या लोट गाड्या लावलेल्या आहेत तर त्या ठिकाणी रोज संध्याकाळी भाजीपाला विक्रेत्यांची भांडण होताना दिसून येत आहे. जागेवरून हे वाद सुरू आहेत, मात्र नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष करत आहे. एखादेवेळी येथे मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. याबाबत न.पा. मुख्याधिकारी सपना वसावा यांना विचारले असता त्यांनी या विक्रेत्यांवर पथकाद्वारे लवकरात लवकर कारवाई करू, असे म्हटले आहे.

Protected Content