राज्य शासन आंनद दिघेंच्या नावाने रिक्षा-टॅक्सी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या मंडळासाठी ५० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यभरातील रिक्षा- टॅक्सीचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने १६ मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. आता या मंडळाला आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

या मंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षा-टॅक्सीचालकाला जीवन विमा कवच तसेच कुटुंबीयांना मोफत वैद्याकीय उपचार दिले जाणार आहेत. अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये आणि ज्या रिक्षा किंवा टॅक्सीचालकांच्या मुलांना शिकायचे असेल त्यांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल. त्यांच्या मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केले जाईल. मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.

Protected Content