महाशिवरात्री महोत्सवातील विशाल शिवलिंगाचे दर्शनार्थ भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ( व्हिडीओ )

shiv ling 1 copy

जळगाव (प्रतिनिधी) । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे यावर्षी जळगाव जिल्हावासियांसाठी महाशिवरात्री निर्मित विशाल शिवलिंगाचे निर्माण केले गेले असून ओंकारेश्वर मंदिरा समोरील परिसरात तीस फुटी बेलपत्राचे शिवलिंग निर्माण केले आहे. विशाल शिवलिंगाचे दर्शनार्थ भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सामाजिक आशय देणाऱ्‍या विविध आरासही प्रभावी ठरल्या आहेत. ब्रह्माकुमारीज्च्या वतीने अजन्माचा जन्म महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ओंकारेश्वर मंदिर परिसरात प्रथमच ऐतिहासिक भव्य शिवलिंगाचे निर्माण करण्यात आले आहे. भाविकांना जळगाव जिल्ह्यात प्रथमच इतके मोठया शिवलिंगाचे दर्शनाचा लाभ मिळणार आहे. विशाल शिवलिंगाचे दर्शनार्थ भाविकांनी एकच गर्दी केली आहे.

सामाजिक आशयासाठी विविध आरास
व्यसनमुक्ती प्रतिकात्मक यज्ञकुंडात व्यसनांची आहुती टाकून व्यसनमुक्त समाज घडविणारा स्टॉल, आत्म शक्ति, सर्वाच्च सत्ता, स्वर्णीम दुनिया आदि बरोबर प्रोजेक्टर द्वारे राजयोग अनुभूती अभ्यास व इतर स्टॉलही शिवलिंगाच्या आजूबाजूस असणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता प्रतिदिवस महाआरतीचे आयोजन असून रात्री 11 वाजेपर्यंत शिवभक्तांसाठी दर्शनार्थ खुले असणार आहे. तरी उपरोक्त सर्व कार्यक्रमात जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरीकांनी, शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, निर्देशिका, जळगाव उपक्षेत्र यांनी केले आहे.

महाकाय शिवलिंग भाविकांचे श्रद्धास्थान
ब्रह्माकुमारीज् तर्फे सुमारे तीस फुटी शिवलिंगाचे निर्माण करण्यात आले आहे. सुमारे एक हजार किलो लोखंडाचे एमएस पाईप, हिरवे ज्युट आणि सुमारे पन्नास गोण्या बेलपत्र आदिच्या सहाय्याने सदरहू शिवलिंगाचे निर्माण केलेले आहे. याचे आरेखन संगणकाच्या मदतीने करण्यात आले असून शिवलिंगाचा आकार वीस फुट व्यास आणि तीस फुट उंच असा आहे.

अवघ्या पाच दिवसात उभे राहिले शिवलिंग
या शिवलिंगाचे निर्माण अवघ्या पाच दिवसात ब्रह्माकुमारीज् परिसारातील सदस्यांमार्फत साकारण्यात आलेले आहे. ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीच्या मार्गदर्शनाखाली भगीरथ शाळेचे डॉ. विजय शांताराम पाटील, शिवफेब्रीकेशनचे किशोर मराठे, पुष्प ग्राफिक्सचे मिनल भामरे यांच्या संकल्पनेतून आणि ब्रह्माकुमारीज्चे जवळपास पन्नास स्वयंसेवकांच्या मदतीने शिवलिंगाची उभारणी करण्यात आलेली आहे.

विविध प्रबोधन आरास ठरणार विशेष आकर्षण
व्यसनमुक्ती प्रतिकात्मक यज्ञकुंडात व्यसनांची आहुती टाकून व्यसनमुक्त समाज घडविणारा स्टॉल, आत्म शक्ति, सर्वाच्च सत्ता, स्वर्णीम दुनिया आदि बरोबर प्रोजेक्टर द्वारे राजयोग अनुभूती अभ्यास व इतर स्टॉलही शिवलिंगाच्या आजूबाजूस असणार आहेत.

दिन दिवसातील कार्यक्रम
3 ते 5 मार्च दरम्यान आयोजित हे शिवलिंग सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता प्रतिदिवस महाआरतीचे आयोजन असून पहाटे 4 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत शिवभक्तांसाठी दर्शनार्थ खुले असणार आहे.

राजयोग शिबिराचे आयोजन
महाशिवरात्री महोत्सवानंतर ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्र, ढाके कॉलनी, जळगाव येथे दि. 7 ते 9 मार्च रोजी तीन दिवशीय राजयोग अनुभूती शिबिराचे आयोजन सकाळी 8 ते 9 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content