जळगाव प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या एका दुकानात दुकानदाराचे लक्ष नसतांना गल्ल्यातून तीन हजार रूपये चोरणारा चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, कुषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्ये फिर्यादी दिपक किसन स्वामी यांचे दुकान आहे. या दुकानावर पाण्याचे जार, थरमास याची विक्री केली जाते. दुकानावर रविंद्र मोहन चौधरी व फिर्यादीचा मुलगा सौरभ असे काम बघतात. १० मे २०१९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सौरभ हा जेवणासाठी घरी गेला. त्यावेळी दुकानावर रविंद्र हा एकटा होता. जातांना सौरभ यांने गल्यात तीन हजार रूपये ठेवले होते. जेवणानंतर सौरभ दुकानावर परत आल्यावर गल्ल्यातील तीन हजार रूपये मिळून आले नाही. म्हणुन रविंद्र चौधरी यास विचारले असता त्याने सांगीतले की, तुम्ही जेवण करण्यास गेले असता एक मनुष्य दुकानावर आला होता व त्याने पाण्याचे जार पाहीजे असल्याबाबत विचारपुस केली व त्यानंतर तो मनुष्य निघुन गेला. सौरभ याने लागलीच दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता एक तरूण गल्ल्यातून पैसे काढल्याचे स्पष्ट झाले. याबाबत एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला संशयित तरूण जामनेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. उगले, अपर पोलीस अधीक्षक मतानी, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोहेकॉ रा.का.पाटील, बापु पाटील, विनोद पाटील, किशोर राठोड, विजय पाटील, अरुण राजपुत, सचिन महाजन यांचे पथक तयार करुन रवाना केले होते. पाळधी व पहुर येथे जावून संशयित आरोपी अक्षय प्रकाश छाडेकर (वय 21) रा. पहूर पाळधी ता.जामनेर जि. जळगाव याला अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.