रोहिणीताई खडसे यांच्या संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर  विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसमवेत संवाद रोहिणीताई खडसे संवाद साधत असून याच्या दुसऱ्या टप्प्यास  कुऱ्हा परिसरातून करण्यात आली.

 

मुक्ताईनगर  विधानसभा क्षेत्रातील १८२ गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसमवेत संवाद साधण्यासाठी रोहिणीताई खडसे यांनी १५ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस जनसंवाद यात्रा सुरू केली आहे.  यात्रेला पहिल्या टप्प्यात बोदवड तालुक्यातील गावांमध्ये उत्तम  प्रतिसाद लाभला.

आता मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला मंगळवार दि.१४ सप्टेंबर रोजी  सुरुवात झाली असून यात्रेच्या अकराव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून धामणगाव तांडा, धामणगाव, बोरखेडा जुने, बोरखेडा नवे, मोरझिरा,थेरोळा, कोऱ्हाळा ,पिंप्राळा येथे ग्रामस्थां समवेत संवाद साधून त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

प्रसंगी रोहिणीताई खडसे यांनी आ. एकनाथराव खडसे यांचे कार्यकाळात या मतदार संघात झालेल्या अनेकविध विकास कामांचा पाढा वाचला. नाथाभाऊ यांच्या माध्यमातून कुऱ्हा परिसरातील प्रत्येक गावाला चहुबाजूंनी डांबरी रस्त्याने जोडण्यात आले प्रत्येक गावात सामाजिक सभागृह,बुद्धीविहार, अंतर्गत काँक्रीटीकरण ,पाणी पुरवठा योजना, रुग्णालय व विविध विकास कामे करण्यात आले हे करत असताना त्यांनी कधी जातीवाद केला नाहीत्याची परतफेड म्हणून हा परिसर प्रत्येक वेळी नाथाभाऊ यांच्या पाठीमागे उभा राहिला. परंतु, गेले तीन वर्षांपासून आपल्या परिसराचा विकास खुंटला आहे. आता नाथाभाऊ हे विधानपरिषदेत गेले आहेत त्यांच्या आणि रविंद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन रोहिणीताई खडसे यांनी उपस्थितांना दिला. आपल्या सर्वांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद व्हा असे त्यांनी आवाहन केले.  तसेच जनतेने आतापर्यंत नाथाभाऊ ,रविंद्र भैय्या पाटील यांना जसे आशिर्वाद दिले तसे प्रेम आशीर्वाद आपल्याला मिळावा असा आशावाद व्यक्त केला.

 

यावेळी यात्रेत यात्रा प्रमुख ईश्वर राहणे ,निवृत्ती पाटील,पवनराजे पाटील,दशरथ कांडेलकर, विकास पाटील , रंजना कांडेलकर, छाया  सवळे, माणिकराव पाटील, डॉ. बी. सी. महाजन, नितीन कांडेलकर, रवींद्र दांडगे, शिवा पाटील, रणजित गोयनका, अतुल पाटील, पवन पाटील डी. ओ. पाटील, गजानन पाटील, गोपाळ पाटील, सोनू पाटील, नंदकिशोर हिरोळे, मधुकर गोसावी, रवी पाटील, पुंडलिक कपले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

Protected Content