रावेर शौचालय घोटाळ्याची व्याप्ती मोठी असणार- माजी मंत्री एकनाथराव खडसे

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील शौचालय घोटाळ्यात एक किंवा दोन व्यक्ती नसून याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा मुळापर्यंत जाऊन तपास करण्याची जबाबदारी पोलीसांवर आहे. अधिकाऱ्यांवर या कामाची महत्वाची जबाबदारी असतांना इतके महिने काय पाहिले असा सवाल उपस्थिती करत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथराव खडसे यांनी संपुर्ण जिल्ह्यातील शौचालय योजनांची चौकशीची मागणी केली आहे.

पत्रकार कृष्णा पाटील यांच्या पाठपूराव्यामुळे रावेर पंचायत समिती मधील दिड कोटीच्या वर असलेले वयक्तीक शौचालय घोटाळा बाहेर आला. यामुळे गुन्हा देखील दाखल झाला आहे. यावर माजी मंत्री एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील हा विषय असून पोलिसांनी रावेर तालुक्यातील वयक्तीक शौचालय योजना व सार्वजनिक शौचालय योजनांची संपूर्ण चौकशी करावी. लाभार्थीची यादीत नाव असतांना शौचालय बांधकाम केले किंवा नाही. शौचालय बांधकाम जुने दाखवून नविन शौचालय बांधकामांची बिल काढली का.? वयक्तीक शौचालय न बांधताच बिल काढली का.? शौचालय बांधकामाचे मस्टर व्यवस्थित आहे का.? मस्टरवर सह्या असणारे तेच व्यक्ती आहे का.? यात बिडिओ लेखापाल यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली का.? या संपुर्ण प्रकरणाचे इन्वेस्टीकेशन पोलिसांनी करण्याची गरज असलेल्याचे मत माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केले आहे. तर सुरवातीपासून वयक्तीक शौचालय योजना संशयाच्या भोवऱ्यात होती. याला पंचायत समिती मधील संपूर्ण साखळी जबाबदार असून पोलिसांनी गाव पातळीवर लाभार्थीची पडताळणी केल्यास अनेक धक्कादायक नावे पुढे येतील.असे पत्रकार कृष्णा पाटील सांगतात. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन आजचा तिसरा दिवस आहे.

या शौचालय घोटाळ्याचे तपास अधिकारी सपोनि शितलकुमार नाईक सांगतात की,  बँक व पंचायत समितीशी आमचा पत्रव्यवहार सुरु असुन ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान सर्व टेक्निकल पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. तसेच आरोपींच्या शोधात देखिल पोलिस आहे. शौचालय संदर्भातील सर्व पैलुंची बारकाई पडताळणी केली जाईल असे श्री नाईक यांनी सांगितले. सद्या पंचायत समितीत सर्व विभागात ओस पडलेला असुन सर्वांच्या नजरा रावेर पोलिसांच्या तपासाकडे लागून आहे.

 

Protected Content