नवी दिल्ली –देशातील विविध राज्यांमध्ये १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. यात टप्प्याटप्प्याने वर्ग सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरु होणार आहेत. आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली म्हणजे एसओपी हि राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणं ही राज्यांची शाळांची जबाबदारी आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे.
शिक्षण मंत्रालयाने निर्देश दिल्यानुसार पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात. विद्यार्थ्यांना रोज हजर रहावंच लागेल असं नाही त्यासाठी हजर असण्याबाबतची मुभा देण्यात आली आहे