मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आईसीसीकडून आईसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात मध्ये खेळवली जाईल. आठ संघांदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची ही 15 वी आवृत्ती आहे.
गेल्या वेळी 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती, ज्यामध्ये पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते. या वेळी या स्पर्धेत, पाकिस्तान 1996 नंतर प्रथमच जागतिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार आहे. तर संयुक्त अरब अमीरात हे तटस्थ ठिकाण म्हणून निवडले गेले आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जातील आणि आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचा सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे होणार आहे. 23 फेब्रुवारीला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी दुबईत तर दुसरा उपांत्य सामना 5 मार्च रोजी लाहोरमध्ये खेळवला जाईल. अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोर येथे होणार आहे. मात्र, भारताने अंतिम फेरी गाठल्यास हा सामना दुबईत होणार आहे.
1998 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेला आधी आयसीसी नॉकआउट ट्रॉफी असे म्हटले जात होते. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक वेळा (प्रत्येकी दोन) जिंकले आहेत. 2017 मध्ये पाकिस्तानने हे विजेतेपद पटकावले होते. भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत असताना चाहत्यांच्या नजरा आता 23 फेब्रुवारीला दुबईत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.