अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कळमसरे ता. अमळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी हानिया वसीम खान या विध्यार्थिनीने क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांची हुबेहूब वेशभूषा करून सर्वांचे मने जिंकली आहेत.
या देशात होऊन गेलेल्या संताची भूमी, शिवरायांची भूमी, फुले, शाहू, आंबेडकरांची व क्रांतीकारांची भूमी म्हणून ओळखली जाते. हे योद्धे आजही या भूमिवर नसले तरी त्यांनी या भूमिला दिलेली विचारांची, आचारांची व संस्कारांची खाण आजही जाती धर्मात वाटता येणार नाही. याचा चपराक हानिया वसीम खान या विध्यार्थिनींने समाजात व धर्मात वाटा पाडणाऱ्याना दिला.
ना हिंदू बनुगी, ना मुसलमान बनूगी इन्सान की बेटी हूं इन्सान बनूगी हा आदर्श हानिया खान या चिमुकलीने ३ रोजी कळमसरे ता अमळनेर येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सावित्री माई फुले यांच्या जयंती दिना निमित्ताने दिला असून तीचे वडील वसीम खान व आई हिचेही सर्वत्र कौतुक होत आहे.