यावल प्रतिनिधी । शहरातील नगर परिषद ,कोर्ट रोड मार्गवरील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील दिवसाढवळया पडलेल्या शस्त्र दरोड्याचा तपास गेल्या तीन दिवसापासून सुरु असून अद्यापही दरोडेखोरांचा तपास लागलेला नाही. यामुळे शहरात पोलिस यंत्रणेसाठी नागरिकांकडून नाराजीचे सुरु उमटत आहे.
दरम्यान या संदर्भातील माहिती अशी की यावल शहरातील मुख्य बाजारपेढेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक आणी शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे दिनांक ७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बन्दुकीच्या जोरावर जबरी चोरी करून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते . तरी या घटनेचा तात्काळ तपास लागावा यासाठी पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंढे व अप्पर पोलीस अधिक्षक चंदकांत गवळी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक बी के बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडेखोरांना तात्काळ तपासकामी पोलीसांनी चार पथके तयार केली आहे.
मात्र तरी देखील तिन दिवस झालीत अद्याप या दरोडयाच्या तपासात कोणतीही प्रगती झालेली दिसुन येत नसल्याने यावल येथे दुकानात पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या भेटी दरम्यान कवडीवाले कुटुंबानी १८ वर्षापुर्वी याच दुकानात झालेल्या ५० लाखाच्या धाडसी दागीने चोरीचा तपास आज पर्यंत लागलेल्या नसल्याने यामुळे या दरोडया तपास पोलीस यंत्रणेकडुन लागेल का ? असा प्रश्न पालकमंत्र्या समोरच उपस्थित केला होता , याच पार्श्वभुमीवर तपास सुरू राहीला तर मग आज३दिवस मग १५ दिवस नंतर महीना व मग वर्ष असा तपास सुरू राहील मग काही कालावधीनंतर लोक हे विसरतील मात्र दरोडेखोरांचा शोध लागणार का असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहे.