इचलकरंजी (वृत्तसंस्था) राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे याचे आम्ही स्वागतच करतो. पण मतदान आणि मतमोजणी यांच्यात तीन दिवशांचे अंतर आहे. या तीन दिवसात काहीही गडबड केली जाऊ शकते. म्हणून मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी करण्याची मागणी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
केंद्रीय निवडणू्क आयोगाने राज्यातील 288 जागांवर निवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यात 21 ऑक्टोबर मतदान तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणी यात तीन दिवसाचे अंतर आहे, यावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे. याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून मतमोजणी करण्याची मागणी करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले आहे.