चारचाकीला धडक देवून रिक्षा पलटी; चालक गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रिक्षा चालकाने नियंत्रण सुटल्याने रिक्षाने समोर उभ्या असलेल्या चारचाकीला धडक देवून रिक्षा पलटी झाली. ही घटना गुरुवारी २० जुलै रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य चौकातील एलआयसी ऑफिसजवळ घडली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

 

अधिक माहिती अशी की, शहरातील स्वातंत्र्य चौकातील एलआयसी ऑफिसजवळ गुरूवारी २० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रस्त्याच्याकडेला कार लावलेली होती. स्वातंत्र्य चौकातून जिल्हापेठ पोलीस ठाण्याकडे रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८३५२) भरधाव वेगाने जात होती. याचवेळी रिक्षाने चारचाकी वाहनाला कट मारला. यामध्ये रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्यावर पलटली. यामध्ये रिक्षाचा पुढचा भाग पुर्णपणे चक्काचूर झाला असून मोठे नुकसान देखील झाले आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रिक्षा चालकाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी चालकावर उपचार सुरु आहे.

Protected Content