मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर हे निकाल देणार असून याचे राज्यातील जनतेसाठी लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, राज्यातील सत्ता संघर्षावर विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर हे शिवसेनेतील अंतर्गत कलहावर नेमके कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र ? याचा महत्वाचा निर्णय देणार आहे. याआधी राजधानीतील हालचाली गतीमान झाल्या आहे. काल रात्री उशीरा एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. तर आज सकाळी मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नियोजीत दौर्यासाठी हिंगोली येथे रवाना झाले.
दरम्यान, आज सायंकाळी चार वाजता राहूल नार्वेकर हे निकाल वाचणार असून या निकालाचे राज्यातील जनतेसाठी लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती आता समोर आली आहे. यामुळे राज्यातील जनता ही याचा निकाल पाहू शकणार आहे.