यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवासडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रावेर विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षासह शिवसेना ( उबाठा ) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी आणी प्रहार जनशक्तीच्या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार अनिन छबिलदास चौधरी व सोबत वंचितच्या शमीभा पाटील या देखील रिंगण्यात होत्या. यात तिरंगी लढतीचा निकाल लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीतील तिन प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणेत बंद झाले असुन, उद्या होणाऱ्या निकालाची उत्सुकता व मतमोजणीकडे रावेर विधानसभेतील सर्वसामान्याचे लक्ष लागले असुन निकालाची उत्सुकता शिगेला पहोचली आहे सर्वच पक्षांनी आमचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रीया ही काही तुरळक घटना वगळता अत्यंत शांततेच्या वातावरणार पार पडली आहे. या निवडणुकीत रावेर विधान मतदारसंघातील ३ लाख९ हजार पैक्की दिनांक २० नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या मतदानात २ लाख२७ हजार मतदारांनी आपल्या मतदानांचा हक्क बजावला,यात महिला मतदारांनी केलेले मतदान हे लक्ष वेधणारे होते. या संयुर्ण निवडणुकीत कोणतेही आरोप प्रत्यारोप न करता विकासाच्या प्रश्नाभोवतीच राहिली असे असतांना या अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे यांना लाडकी बहीण योजनेचा,महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांना माजी मंत्री स्व. बाळासाहेब मधुकराव चौधरी यांच्या कारकीर्दीत उभारण्यात आलेली विविध धरणे व शेतकरी हितासाठी उभारण्यात आलेला मधुकर सहकारी साखर कारखाना कुणामुळे बंद पडला हे मुद्दे त्यांच्या निवडणुकी मतदारांचे लक्ष वेधणारे ठरले. त्यांनी शिरीषदादा चौधरी यांनी केलेली कामे देखील लोकांच्या समोर प्रभावीपणे मांडली.
प्रहार जनशक्ती मित्रपक्षाच्या तिसरी आघाडीचे उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी कुठलेही संविधानिक असे पद नसतांना यावल शहरात व ईतर काही ठिकाणी आपल्या पक्षाच्या बळावर निधी मंजुर करून केलेले रस्ते विकासकामे व पारिसरातील हजारो महिला बघीनींना शासकीय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या भांड्यांचा मिळून देण्यात यश मिळाल्याने या निवडणुकीत तिसऱ्या प्रबळ उमेदवार म्हणुन ते प्रचारात शेवटच्या टप्प्यात दिसुन आले. एकंदरीत पंचरंगी वाटणारी या निवडणुकीचा कल आता राजकीय जाणकारांच्या मते तिरंगी व चुरशीची वाटू लागले आहे .
रावेर विधानसभेच्या २०१९च्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ६९ .३४ टक्के मतदान होवुन २ लाख३ हजार ४२८ ईतकी मतदान होवुन विद्यमान आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांना ७७ हजार९४१ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी हरिभाऊ माधव जावळे यांना ६२ हजार३३२ऐवढी मते मिळाली तर अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांना निवडणुकीचा निकाल फिरवणारे ४४ हजार८४१ अशी लक्ष वेधणारी मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष मधुकरराव चौधरी हे दहा हजार मतांनी विजयी झाले होते. उद्या होणारे निकाल हे २०१९च्या निकालाची पुनरावृत्ती करता की वेगळे निकाल लागतात हे येणाऱ्या २४ तासात कळणार आहे.