धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी ) राज्य परीवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये दिव्यांग ,जेष्ठ नागरिक व महिलांसाठी आसन राखीव असतांना अन्य प्रवासी त्यावर सर्रास बसत असल्याने महिला व दिव्यांग यांची कुचंबणा होत आहे. यात धक्कादायक म्हणजे यावर वाहक आक्षेप घेतांना दिसत नसल्याने दिव्यांग व महिला यांच्या मध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
आपला प्रवाश सुखाचा होवो.हे एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्य असले तरी एसटी बसमध्ये दिव्यांग, जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशाना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राखीव आसनावर बसलेल्या प्रवाशाना हक्काची जागा बाबत जाणीव करुन दिली असता प्रवाशी भाडंतात. प्रवासात मनस्ताप नको म्हणून रिक्त असलेल्या जागेला प्राधान्य दिले जात आहे. राखीव आसन केवळ नावालाच असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. बसमध्ये ४४ आसना पैकी १५ आसने राखीव असतात त्यात बसवाहकासाठी एक क्रमांकाचे आसन ,दिव्यांग प्रवाशाना ३ व ४ ,जेष्ट नागरिकांना ४ व ५ ,आमदारसाठी ७ व ८ ,स्वातंत्र्य सैनिकसाठी ११ व १२, महिलांसाठी १३ ,१४, २०, २७, व २८ आणि पत्रकारांसाठी १९ क्रमांकाचे आसन राखीव असतात. दिव्यांग प्रवाशाना एसटीमध्ये चढविणे व उतरविण्याची जबाबदारी वाहकाची आहे. असे वाक्य एसटीच्या दारावर लाल अक्षरात लिहलेले आहे. मात्र याकडे वाहक दुर्लक्ष करतात अशी तक्रारी दिव्यांग प्रवाशी करीत आहे. ग्रामीण भागातील एसटीमध्ये राखीव आसनावर कब्जा करीत प्रवाशी गोधंळ करतात. राखीव आसनांचा खरोखर लाभ दिव्यांग व महिलांना मिळणार का असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.