आरबीआयने वर्षभरात एकही दोन हजाराची नवीन नोट छापली नाही

नवी दिल्ली, वृत्तसेवा । गेल्या वर्षी २०१९-२० साली दोन हजार रुपयांची एकही नवी नोट भारतीय रिझर्व्ह बँकेने छापली नाही. त्याच बरोबर बँकेकडून दोन हजारच्या नोटेचे प्रमाण देखील कमी होत असल्याचे RBIच्या वार्षिक रिपोर्टमधून समोर आले आहे.

२०१८ साली बाजारातील एकूण नोटांमध्ये दोन हजारच्या नोटांचे प्रमाण ३.३ टक्के म्हणजे ३३ हजार ६३२ लाख इतके होते. २०१९ मध्ये हे प्रमाण ३२ हजार ९१० लाख इतके झाले. तर मार्च २०२० पर्यंत हेच प्रमाण २७ हजार ३९८ इतक्यावर आले. नोट बंदीनंतर देशात प्रथमच दोन हजारच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. नोटा बंदीच्या माध्यमातून जुन्या ५०० आणि १ हजारच्या नोटांच्या माध्यमातून लोकांना गोळा करून ठेवण्यात आलेला काळापैसा बाहेर काढण्याचा होता.

गेल्या दोन वर्षात ५ हजार ५१२ इक्या दोन हजारच्या नोटा कमी झाल्या आहेत. मुल्याचा विचार केल्यास २०१८ मध्ये ३७.३ टक्के म्हणजेच ६ लाख ७२ हजार ६४२ कोटी रुपये किमतीच्या दोन हजारच्या नोटा बाजारात होत्या. २०१९ मध्ये हेच प्रमाण ६ लाख ५८ हजार १९९ कोटींवर आले. तर मार्च २०२० मध्ये ते आणखी घटले आणि ५ लाख ४७ हजार ९५२ कोटींवर आले. याचा अर्थ दोन वर्षात बाजारातून १ लाख १० हजार २४७ कोटी रुपये मुल्याच्या दोन हजारच्या नोटा कमी झाल्या आहेत.

Protected Content