जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिकेने रस्ते व गटारीची काँक्रीट टेस्टिंग हॅमर मशीन तपासणीच्या उपकरणाद्वारे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत पिंप्राळा, खंडेराव नगर भागात तपासणी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव महापालिकेने काँक्रीट टेस्टिंग करिता टेस्टिंग हॅमर हे उपकरण नुकतेच खरेदी केले आहे. या उपकरणाद्वारे रस्त्याचे व गटारीचे काम केल्यानंतर काँक्रीट टेस्टिंगच्या मदतीने गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता तपासणी करण्यास महापालिकेला सोयीचे होणार आहे तर दुसरीकडे आता निविदाप्रमाणे मक्तेदाराला चांगल्या पध्दतीने काम करावे लागणार असून यावर वचक राहणार आहे. दरम्यान बुधवार २५ मे रोजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मक्तेदाराने निविदाप्रमाणे काम केले आहे की नाही यासाठी शहरातील पिंप्राळा, खंडेराव नगर, तलाठी कार्यालय परिसरात प्रत्यक्ष भेट देवून काँक्रीट टेस्टिंग हॅमर उपकरणाद्वारे कामाची गुणवत्ता तपासण्यात आली. कामासंदर्भात मक्तेदार व त्यांचे प्रतिनिधी यांना सुचना देण्यात आल्यात. याप्रसंगी शहर अभियंता विलास सोनवणी, शाख अभियंता संजय नेमाडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.