मुंबई वृत्तसंस्था | वय वाढलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी रविवार, दि.२ जानेवारी २०२२ रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा लोकसेवा आयोगाने पुढे ढकलली आहे.
वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळावी या कारणास्तव एमपीएससीची परीक्षा आली असून परीक्षांची नवी तारीख लवकरच घोषित होणार असल्याचे लोकसेवा आयोगाने एका ट्विटद्वारे कळविले आहे.
राज्यात सध्या ओमिक्रॉनचा वेग वाढत असून निर्बंध पुन्हा कडक करत आणि यासह वय वाढलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. कमाल वयोमर्यादा ओलांडून गेलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेची संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करत विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता.
त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्य लोकसेवा आयोगानं पत्रक जारी करत अर्ज केव्हा भरता येतील याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावतील वयोवर्यादा ओलांडलेल्यांना २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील तर अर्जांसाठीचं ऑनलाईन शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत भरावं लागेल. तर एसबीआयमध्ये चलनाद्वारे शुल्क भरायचं झाल्यास चलनाची प्रत १ जानेवारीपर्यंत घ्यावी लागेल. त्यानंतर ३ जानेवारीपर्यंत बँकेच्या वेळेत चलनाद्वारे शुल्क करण्यास मुदत देण्यात आली आहे.